Shri Tuljabhavani Temple Festival

   

छबीना :
श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस, पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो व फाल्गुन पौणिमेचा छबिना गुडीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो व वर्षातील २१ निद्रा कालामधील मंगळवारी श्री शयन ग्रहामध्ये निद्रीस्त असल्यामुळे छबिना काढला जात नाही. बाकी वर्षभरात वरील प्रमाणे छबिना काढण्यात येतो. निद्रा कालावधीमध्ये स्थानिक भक्त पुजारी जोगवा मागत नाहीत. छबिना म्हणजे श्रीची उत्सव मुर्ती एका चादीच्या मेघ्डंबरीमध्ये व श्रीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्रीच्या चांदीच्या अंबारी मध्ये चांदीची मुर्ती व पादुका ठेवून मंदीरा भोवती एक प्रदिक्षिणा पुर्ण करतात याला छबिना म्हणतात.


चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा)- मराठी सवंत्स र शालिवाहन शक :
या दिवशी पहाटे ४ वाजता चरणतिर्थ होते. चरणतिर्थाच्या वेळैस भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार श्रीस घालण्याात येतो. चरणतिर्थ होवून सुर्यादय समयी मंदीराच्या मुख्य् शिखरासमोर छतावर मंदीर संस्था मार्फत गुढी उभारण्यात येते. या गुढीकरीता कळसाची आब्दास‍गीरी,महावस्त्र् , सेवाधारी यांना देण्याात येते. महंत तुकोजी बुवा चरणतिर्थानंतर सदर अब्दासगिरीस फुलाने पाणी शिंपडून उगळलेल्या चंदनाचा गंध, हळद-कुंकु, अष्टगंध, गुलाल, बुक्काम, अक्षदा वाहवून या आब्दागिरीस श्रीला नेसवलेले महावस्त्र् ,खण पांघरुन घालून यास लिंबाचा एक डहाळा,साखरेचा हार घालुन गुढी मुख्य‍ शिखरासमोर उभारण्यात येते.


चैत्र शुद्ध //९// नवमी (राम नवमी) :
मंदीर संस्थान कडुन तुळजापूर येथील राममंदीर(घुमट) येथे दुपारी १२.०० चे सुमारास राम जन्मानिमीत्त रामजन्मोयत्सव पुजारी यांचेकडून मदीर व्यवस्थापक यांना निमंत्रण येते. मंदीर संस्था‍नाकडून रामजन्मपुजेस पुजा साहित्य, गुलाल, खडीसाखर, रामफळ, उदबत्तीस, कापूर,साखरेचा हार,नारळ घेवून मंदीर संस्थानचे व्यवस्थापक शिपाई, पट्टेवाले, सहकारी यांचेसह रामजन्म उत्सवास हजर राहतात. या रामजन्म उत्सवास मंदीर संस्थानाकडून १००१/- रु. उत्सवास देण्यात येतात रामजन्म उत्सव अटोपून रामजन्म उत्सवाचे पुजारी मंदीर संस्थानाच्या प्रतिनीधीना रामजन्मो‍त्वाचा प्रसाद देवून इच्छेप्रमाणे पाहुणचार करुन पाठवितात. याप्रमाणे रामजन्म उत्सव पुर्वपार प्रथेप्रमाणे करण्यात येतो.


माहे वैशाख शुध्द‍ //३// तृतीया (अक्षय तृतीया ) :
श्रीहा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात.अश्विन शुध्द व्दितीया व तृतीया या दिवशी ठरलेल्या वेळे प्रमाणे चरण तिर्थ पुजा, अभिषेक पुजा, नेहमीप्रमाणे करण्यातत येईल दररोजच्याक पुजा घटाचीमाळ, महंत सेवाधारी पुजारी ज्यां ची पाळी असेल त्या प्रमाणे घआची माळ घालुन पुजा करणेकार्यक्रम करतील. संध्या काळी नेहमीप्रमाणे छबीना काढण्या्त येईल. यांचे वाहन वेगळे असेल . एवढाच बदल या दोन्ही दिवसात करण्यात येतो. व्दितीया ते अष्टमी या काळात स्थानिक व बाहेर गावातील भक्तगण श्रीस व श्रीच्या घटास इतर परिवार देवता यांना कडकणे बांधणे करीता देतात/ बांधतात. बाकी कार्यक्रम नेहमी प्रमाणे आहे . वेळेवर होण्याकरीता सर्वानी तसदी घ्यावी लागते. व संध्याकाळी छबीना काढण्यात येतो.


श्रावण शुद्ध //५// पंचमी (नागपंचमी) :
चरणतिर्थ झालेनंतर भवानी शंकराचे पुजारी गुरव, इनामदार होमच्या समोर भवानी शंकराच्या पितळेचा नागफणा माडून त्या्समोर चिखलाची नागदेवता तयार करुन ठेवतात. नागपंचमी निमीत्त स्थानिक महिला नागोबाच्या पुजेसाठी येऊन या नागोबास दुध, लाहया, उकडलेले कानवले दाखवतात. दुध नागोबास घालुन, पुजाआरती करुन, दो-याचे पवते अर्पण करतात. या नागोबाची पुजा सुर्यादयी करुन उत्तर पुजा सायंकाळी ६.०० ते ६.१५ दरम्यान करतात. यावेळी चौघडा वाद्य वाजवून उत्तर पुजा करुन मंदीर व्यवस्थापक किंवा प्रतिनीधीयांचे उपस्थितीत या नागोबाचे विसर्जन कल्लो्ळ तिर्थामध्ये करतात. बाकी इतर कार्यक्रम नेहमी प्रमाणे होतात.


श्रावण शुद्ध //१५// पौर्णिमा (नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन ) :
चरणतिर्थास व धुपआरतीच्या वेळी श्रीस राखी रक्षाबंधन निमीत्त अर्पण करण्यात येते. या दिवशी सकाळच्या अभिषेक पुजेच्या वेळी मंदिर संस्थानाचा प्रतिनिधी अभिषेक पुजेस हजर रहावे लागते. अभिषेक पुजेस सुरुवात करणेस गेल्या नंतर पुजारी पंचआरती ओवाळतात. तत्पुर्वी या आरतीस मंदिर संस्थानच्या अभिषेक सुरुवात करण्यास गेलेल्या प्रतिनिधीने पंचारतीस स्पर्श करुन नमस्कार करावा. यानंतर पुजारी श्रीस आरती करतील प्रतिनिधीनी सिंहासनावर डोके ठेवून नमस्कार करावा.


भाद्रपद वद्य//८// अष्टमी (सायंकाळी श्रीची मंचकी निद्रा) (घोर निद्रा) :
यादिवशी सकाळी चरण तिर्थ झाल्यानंतर पलंगे शयन कक्षातील पलंगावरील गाद्या, लोड गिरदया, गणेश विहार येथे काढून अनुन ठेवतात.


भाद्रपद वद्य //३०// आमावस्या :
या दिवशी बाहेर गावावरुन नवरात्र उत्ससव मंडळी व दिपप्रज्वलीत करुन नेण्यासाठी असंख्य मंडळे तुळजापूरात दाखल होतात. मंदिरातुन पुजा करुन मशालीची पुजा करुन मशाल मंदिरातील दिव्यास लावुन पेटवून आपापल्या गावातील नवरात्र उत्सावातील देविची स्थापना केलेल्या ठिकाणचे दिवे या मशालीने प्रज्ववलीत करुन उत्सव साजरा करतात. या दिवसापासून दुस-या दिवशी घटस्थापनेपर्यत गावोगावचे तरुण आपापली तरुण मंडळे घेवून येतात. मंदिरात पेटवलेली ज्योत ते आपल्याा गावापर्यत क्रमाक्रमाणे ज्योत घेऊन पायी ( धावत) जातात. गावी पोहचल्याानंतर विधीपूर्वक घटस्थापना करुन पुजा,आरती, नऊ दिवस करतात.


शारदीय नवरात्र महोत्सव – माहे अश्विन शुद्ध //१// प्रतिपदा (घटस्थापना ) :
नवरात्रनिमीत्त मंदिराचा संपुर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्या्त येतो. मंदिरातील व्दार,महाव्दारांना अंब्याच्या पानाचे तोरण व नाराळाचे फड बांधण्यात येतात. श्रीची सिंहासनावर प्रतिस्थापना ठरलेलया वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम केले जातात. प्रतिपदेपासून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थेनकडून नवरात्रनिमीत्त धर्मशाळा येथे नैवेद्य ब्राम्हण भोजन, व अन्न दानाचा कार्यक्रम प्रतिपदा ते नवमी व वद्य प्रतिपदा यामध्ये श्रीस व गावातील सर्व दैवता यांना नैवद्य यांच्या् नावे प्रोक्षण करण्यात येतो (दिला जातो). सर्व नैवेदय दिल्यानंतर वरणी घेतलेले ब्राम्हण जे की नवरात्रनिमीत्त पाठ, जप, करणारे आहेत. यांना ब्राम्हैण भोजन सदर स्वयंपाक ब्राम्हणाच्या आचा-याकडून करण्यात येतो. सकाळच्या् पुजेचे अभिषेक ठरलेलया वेळी सुरुवात केले जातात. गर्दी असल्या्स सकाळी १०.३० वाजता अभिषेक बंद करावे लागतात. नंतर पुढील पुजा आरती सव्वा्अकरा पर्यत करण्यात येते. तसेच शारदीय नवरात्र महोत्सवा मधील अनुष्ठानाची वर्णी पुढील प्रमाणे देण्यात येते. १. घटस्थापनेपासून घटस्थापने पर्यत घटाची व्यवस्था पाहतील व स्थानिक कुमारीका, सुवासिनी यांचेकडून होणारे घट पुजन व कडकणे बंधन करतील. २. सप्तशती पाठ २६ या पाठाकरीता २६ वर्णी देण्यात येते. ३. तुळजा सहस्त्रानाम ७ या पाठाकरीता ७ वर्णी देण्यात येते. ४. भवानी सहस्त्रानाम १२ या पाठाकरीता १२ वर्णी देण्यात येते. ५. भवानी शंकर अभिषेक २० या पाठाकरीता २० वर्णी देण्याीत येते. ६. नवगृह जप ४ रवि एकुण जप ७००० चार जनास विभागून देण्याात येईल्‍. ७. चंद्र ५ ब्राम्हण, प्रत्येकी २००० जप ८. मंत्र भैाम (मंगळ) ४ ब्राम्हण २५०० जप ९. बुध २ ब्राम्हण प्रत्येतकी २००० जप १०. गुरु ४ ब्राम्हण ९५०० जप विभागून देण्यात येईल. ११. शुक्र ४ प्रत्येकी ४००० जप १२. शनि ७ ब्राम्हण एकुण ८५०० जप विभागुन देण्यात येतात. १३. राहू ५ ब्राम्हण ७००० जप १४. केतू ५ ब्राम्हण ७००० जप १५. मुंथा ४ १६. देवि पुरण १ १७. मुळ मंत्र१ १८. सालकर जोशी १ १९. सालकर कुलकर्णी १ २०. भवानी शंकर १ २१. सौदर्य लहरी १ २२. ऋतवीज ३ २३. नैवद्य व भोजन व्यवस्था० ९ २४. सरकारी उपाध्येव १ येथून सरकार प्रदक्षिणा करुन कार्यालयाकडे प्रयान करतील पुढील कार्यक्रमाची चर्चा करुन ते घटस्थापनेचा कार्यक्रम संपलेला आहे.


अश्विन शुद्ध //४// चतुर्थी :
या दिवसापासून श्रीच्या दररोजच्या व कार्यक्रमा व्यतरिक्त सकाळच्या पुजेनंतर श्रीस महाअलंकार ,मुरली अवतार, महापुजा करण्या्त येते. तुळजाभवानीमातेने दैत्याचा वध केला . या वधानंतर सर्व देवता दैत्याच्या छळापासून मुक्ते झाल्या. यावेळी श्रीकृष्णाने श्रीस आपली मुरली अपर्ण् केली या प्रमाणे श्रीची मुरली अलंकार अवतार पुजा मांडण्यात येते. श्रीने मुरली वाजवून सर्व भयभित देवता, पुर्ववत स्वंर्ग प्राप्तीयचा आनंद घेऊ लागले.


अश्विन शुद्ध //५// पंचमी (ललित पंचमी) :
श्रीच्या दररोजच्या् पुजा नेहमी प्रमाणे ठरलेल्या वेळेप्रमाणे होवून सकाळचे अभिषेक संपले नंतर श्रीस महाअलंकार घालण्यात येतात. या दिवशी ललीत पंचमी निमीत्त श्रीस रथ अलंकार पुजा मांडण्यात येते. भगवान सूर्य नारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानीस दिला . या प्रमाणे रथ अलंकार अवतार पुजा मांडण्यात येते.


अश्विन शुद्ध//६// षष्ठी :
भगवान विष्णू क्षिरसागरामध्ये शेष शैयेवरती विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जावून विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातुन निघालेल्या मलापासून दोन दैत्यम उत्पन्न झाले. त्यांचे नाव शुंभ व निशुंभ उत्पन्न होताच शेष शैयेवरील विष्णूवरती आक्रमण करणेस जाऊ लागले. त्या वेळी नाबी कमलात विराजमान असलेले ब्रम्हदेव यांनी विष्णुच्या नेत्र कमलात विश्राम घेणा-या देवीची स्तुती करुन श्रीस जागविले व विष्णुवरती आक्रमण करणा-या दैत्यांमचा वध तुळजाभवानी मातेने केला. म्हुणुन विष्णूने आपली शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिली. त्यामुळे आश्विन शुध्द सहावा दिवशी अभिषेक पूजेनंतर श्रीस महाअलंकार घालण्यात येवून शेष शाही अवतार पुजा मांडण्यात येते. बाकी दरोजचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे संध्याकाळचा छबीना वाहन बदलुन काढण्यात येतो.


अश्विन शुद्ध//७// सप्तमी :
या दिवशी नित्याच्या पुजा नेहमी प्रमाणे हाऊन गोमुख पुजन व सिंहासन गाभारा स्वच्छ पुजन गोमुख तिर्थ स्च‍छता, गोमुख पुजन , गोमुख कोंडणे, गोमुख स्वच्छ‍ करुन येथे पडणारे पाणी साठविले जाते.


अश्विन शुद्ध//८// अष्टमी :
ज्यावेळी स्वर्ग लोकातुन महिषासुराने सर्व देवतेला हाकलुन दिले व एकटाच स्वर्गाचा आनंद भोगु लागला. साक्षात पार्वती अवतार असलेली श्री तुळजाभवानी माता जगताची जगत जननी, विश्वा्ची विश्व पालनी, भारताची भारत माता, सर्व देवतांच्या तेज्यापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुराचा वध केला व सर्व दैवतांना स्वर्ग प्राप्ती चा आनंद दिला.महाअलंकार घालण्यात येवून महिषासुर मर्दीनी अवतार पुजा मांडण्यात येते.


अश्विन शुद्ध//९// नवमी (महानवमी) :
या दिवशी ठरल्यावेळेप्रमाणे चरण तिर्थ ठरलेल्या वेळेप्रमाणे अभिषेक पुजा सुरवात होईल.होमवर केला जाणारा धार्मिक विधी याची मिरवणुक सिंदफळ येथुन निघुन तुळजापूर शहरात- शिवाजी पुतळयापासून – भवानी रोड महाव्दार – मंदिरा भोवती एक प्रदक्षिणा पुर्ण करते. धार्मिक विधी मंदीर कार्यालय मध्ये ताब्यात देण्यात येतो. येथुन पुढे १०.३० पर्यत मंदिरात पोहोचते. सकाळी १०.३० वाजता अभिषेक बंद होवून ११.१५ श्रीचे आरती यावेळेस सरकार उपस्थित राहतील. धुप आरती नंतर भोपे पुजारी यांच्या आरती नैवद्य यानंतर अंगारा घेवून सोवळयातील पुजारी बाहेर येतील. सिंहाच्याच गाभा-यामध्ये सरकार महंत पुजारी मिळून घटास माळ घालतील. गुडीतील पाणी धान्यावर सोडतील हळद कुंकु वाहतील. नमस्कार करुन पुढील प्रदिक्षणा मार्गावर बाहेर येतील.


सार्वत्रिक सिमोल्लंऊघन :
सुर्यास्तापुर्वी विजया दशमी सिमोल्लं‍घन असेल त्या दिवशी सिमोल्लं‍घन करण्यात येते. मंदिर मधुन आपनास तिर्थकडे सिमा ओलांडून शमी पुजन करणेस जाणे. या करीता पुजेचे ताट मंदिरसंस्थान मार्फत तयार करुन महानवमीस बलीदान केलेले शस्त्र्ज सोबत घेवून मंदिर महाव्दार कमान वेस, मंगळवार पेठ, छत्रपती शिवाजी पुतळा मार्गे आपनास तिर्थ येथे सवाद्य बॅड वाजवून सोबत सेक्युरिटी गार्ड दोन, दोन पट्टेवाले शिपाई, छत्रपती संस्थान कोल्हापूर यांचे संस्था्न पासुन यांचे सह सिमोल्लंघन जावून आपनास तिर्थ येथे शमी गणेश पुजन करुन, शस्त्र् पुजन करुन, शमी शस्त्रा ने नारळ फोडून,आरती करुन शमी वाटप करुन विजया दशमी निमित्त अभिचिंतन करुन मंदिराकडे श्रीस शमी वाहन्यास येवून महाव्दार मध्ये येतात.


अश्विन वदय // १४// नरक चतुर्थी (अभ्ंवयगस्नान) :
या दिवशी चरण तिर्थ पहाटे लवकर महंत व पुजारी यांना ठरल्यावेळे प्रमाणे कार्यक्रम करण्या्साठी व्यवस्थापक यांचेमार्फत सांगण्यात येते. अभिषेक पुजा लवकर करण्यात येते व अभिषेक सुर्यादया वेळी संपतील, आरती होईल अशी वेळ परिस्थीतीनुसार योजन्यात येते. या दिवशी श्रीस अभिषेक पुजेच्या वेळेस अभ्यंगस्तानाचा कार्यक्रम करण्यात येतो. म्हणजे श्रीच्या मुर्तीस केशर रहित कोमट पाण्यांने स्नान घालुन श्रीस उत्तम अशा प्रकारच्याा सुवासिक तेल अत्तार लावून सुगंधी द्रव्य (उटणे) , गुलाल,बुक्का, चंदन पावडर अंगास लावण्यात येते. मुर्तीला कोमट पाण्याने स्नान घालून अभिषेक पुजा सुरुवात करण्यात येते. सदर साहित्ये मंदिर संस्थान मार्फत देण्यात येते तसेच इतर भाविक व पुजारी, महंत यांचे इच्छेयनुसार अभ्यग स्नानाची सेवा करतात. पहाटेचे अभिषेक संपल्यानंतर संध्याकाळी ७.०० वाजता नेहमीप्रमाणे अभिषेक,पुजा सुरुवात होईल पुढील विधी नेहमीप्रमाणे करण्यात येतील.


अश्विन वदय //३०// अमावस्या (भिंडोळी) :
या दिवशी सकाळच्या् पुजा ठरल्याप्रमाणे होवून संध्याकाळच्याा पुजेसाठी दशावतार मठाधिपतींची पुजा पूर्वी गरीबनाथ बुवा हे काशीतिर्थ यात्रेस जोतेवेळी श्रीचे दर्शन व परवानगी घेवून जाण्याकरीता मंदिरात आल्याानंतर श्रीने त्यांना दृष्टांत देवून काशिस जाणेची आवश्य कता नाही . परंतु सदर महंताने तिर्थ यात्रेचा संकल्प केल्यामुळे ते श्रीचे दर्शन घेवून पुढे तिर्थ यात्रेस जाण्यातकरीता निघाले असता श्रीने त्यांच्या जवळ एक वेताची काठी, लिंबु, हळद कुंकू यांचेसोबत दिले व काशि येथील गंगेस अर्पण करण्यास सांगितले. त्या प्रमाणे महंतानी काशी यांत्रेस येथील गंगेमध्ये श्रीने दिलेले वेताची काठी, लिंबु गंगेस अर्पण केले.


कार्तिक शुध्द //१// प्रतिपदा (पाडवा ) दिपावली :
या दिवशी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्याने श्रीचे चरण तिर्थ पहाटे लवकर करण्यात येते. त्‍यादिवशी मंदिर संस्थातनचे वतीने नैवेद्य , फराळाचे लाडू, करंज्यात, आनारसे व नेहमीप्रमाणे असा नैवेद्य देण्याित येतो. महाआरती, आवटी यांचेकडून व्येवस्थाापक यांचे घरी येते. येथून सवाद्य आरती मंदिरात प्रवेशल्या‍ नंतर महंत चरणतिर्थ करणेस मंदिरात येतात. चरण तिर्थसआलेनंतर त्यां चे सोबत मंदिर संस्थाान प्रतिनिधी व कर्मचारी आरती घेवून पुढे येतात. चोपदार दरवाज्यातत येवून थांबतात. महंत चोपदार दरवाजा उघडून मध्येन प्रवेश करतात. नमस्का र करुन कुंकू लेवून नंदादीप प्रज्व लीत करुन प्रथम नैवेद्य सरकार यांचा दाखवतात.


कार्तिक शुध्द //१५// पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) :
या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री कल्लोळ तिर्थ स्वच्छ धुवून येथे कल्लोळ तिर्थ मध्ये ताटवा पुजन करुन साडेसातशे कापसाच्या वातीपंत्यामध्ये लावून कल्लोळ तिर्थ ताटवापुजन केले जाते . यास लागणारे साहित्यक कडब्यााचा ताटवा तयार करतात. हळद कुंकू , अक्षदा, फुले, दोन खणे, नारळ, खारीक, खोबरे, सुपारी, हळकुंड, बदाम, खडीसाखर, प्रथम सातशे पंत्याद प्रज्वुलीत करुन कल्लोळ तिर्थाच्या सभोवताली चाहिकडे ठेवून काही पंत्या द्रोणामध्ये ठेवून पाण्यावरती तरंगत सोडून कडब्याच्या दोन्ही ताटवा वरती पाच-पाच पंत्याा ठेवून ताटव्याावरती खन नारळ ठेवून बाकी इतर ओटीचे साहित्य् खनावरती वाहून ओटी भरुन अगरबत्ती, आरती करुन नारळ फोडून तो फोडलेला नारळ तेथेच सोडून पुजन करण्यात येते. यानंतर नित्य‍ पौर्णिमा विधी ही प्रत्येक पौर्णिमे प्रमाणे करण्यात येतो व संध्याकाळी छबीना काढण्यात येऊन जोगवा मागण्यात येतो.


शाकंभरी नवरात्र महोत्सव शुध्द //१// प्रतिपदा :
या दिवशी सकाळी चरण तिर्थ झाल्यानंतर पलंगे शयन कक्षातील पलंगावरील गाद्या , लोड, गिरद्या गणेश विहार येथे काढून आणून ठेवतात. येथे पलंगे, गादीवाले, गादी शिवनारे, पिंजारी येतात. गाद्या उकलुन कापुस मोकळा करण्यात येतो. सदर कापूस नीट करण्यासाठी शहरातुन व बाहेरील खेडयातुन आराधी महिला-पुरुष कापूस नीट करण्यासाठी येतात. सर्व आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे कापसाची पुजा करुन कापूस नीट करतात.


पौष शुध्द //७// सप्तमी :
या दिवशी नित्या‍च्या पुजा नेहमी प्रमाणे हाऊन गोमुख पुजन व सिंहासन गाभारा स्वच्छ‍ पुजन गोमुख तिर्थ स्चछता, गोमुख पुजन , गोमुख कोंडणे, गोमुख स्वच्छ करुन येथे पडणारे पाणी साठविले जाते.


पौष शुध्द //८// अष्ट‍मी :
या दिवशी पुर्वी नियोजीत केल्या प्रमाणे मंदिराचे दरवाजे पहाटे उघडण्यात येतात. हा दिवस श्रीची मंचकावरुन सिहांसनावर प्रतिस्थापना व शाकंभरी नवरात्र निमीत्त घटस्थापना असल्या्ने ठरलेल्या वेळी चरण तिर्थ करण्यात येते. चरण तिर्थ करुन चांदीचा कडी दरवाजा बंद करण्याीत येतो. सरकारी आरती व इतर भोपी पुजारी यांच्यआरत्यआल्‍या आहेत का यांची खात्री करण्यात येते. पुजेची घाट ठरलेल्या वेळी होतच व्यवस्थापक सरकार यांना बोलविण्या्साठी चोपदार,हवालदार दिवटे, आवटी कार्यालयात येतात व आमंत्रित करतात. यांचेसोबत सरकार कडी दरवाजापर्यत येतात.


पौष शुध्द //९// नवमी :
दररोजच्या नित्य‍ पुजेप्रमाणे या दोन दिवसाची विधी होतील व रात्री छबीना काढण्यात येतो.


पौष शुध्द //१०// दशमी :
दररोजच्या नित्य‍ पुजे प्रमाणे अभिषेक पुजे नंतर श्रीस मुरली अलंकार अवतार पुजा मांडण्याात येते. रात्री छबीना काढण्यात येतो.


पौष शुध्द //११// एकादशी :
दररोजच्या नित्य‍पुजेप्रमाणे अभिषेक पुजेनंतर श्रीस रथ अलंकार अवतार पुजा मांडण्याात येते जल यात्रेसाठी येणारे भाविक एकादशी दिवशी मंदिरात दाखल होतात. यांचे निवास व्य वस्थात मंदिर मार्फत भवानी विश्राम गृह येथे करण्यात येते. तसेच यांचे भोजन व्यवस्थास मंदिर मार्फत येथेच करण्यात येते.


पौष शुध्द//१२// व्दायदशी :
चरण तिर्थ पहाटे करण्यात येते. जल यात्रेकरीता आलेले भाविक यांना चहापान करुन नियोजीत जल यात्रेच्या ठिकाणी म्हणजेच आपनास तिर्थ येथे पाठविण्यात येते. जल यात्रेसाठी एक रथ आणण्या‍त येतो. या रथावर श्रीचा एक मोठा फोटो लावून यावर एक छत्र बाजुस दोन आब्दागीरी बांधण्यात येतात. मंदिरात दर्शन घेवून सर्व भाविक पुजारी, महंत, कर्मचारी, आपनास तिर्थ येथे दाखल होतात. आपनास तिर्थ येथे इंद्रायणी देवीची अभिषेक पुजा यजमाना हस्ते, करण्यात येते. श्री सविस्त्रर , पुष्पिहार, ओटी, आरती करण्यात येते व येथील आपनास तिर्थ कुंडावर नव जलकुंभ पुजन व जल पुजन करण्या.त येते. मंदिर संस्थापनचा मुख्यस चांदीचा मोठा कलश पुजे नंतर मुख्यक यजमान यांचे खांद्यावर देण्यादत येतो. तिर्थापासून उत्संव रथापर्यत यजमान हा कलश आपल्याज खाद्यावर घेवून येतात. उर्वरित कलश आपआपले सुवासिनी आपल्या डोईवर घेऊन याबरोबरच निघतात.


पौष शुध्द //१३// त्रयोदशी :
नेहमी प्रमाणे चरणतिर्थ , अभिषेक पुजा होवून श्रीस महाअलंकार छत्रपती भवानी तलवार आवतार पुजा मांडण्यात येते. रोषनाई मांडण्यात येते. यानंतर आरती होवून घटास माळ घालुन नैवेद्य ब्राम्हण पुजन करण्यात येते.


पौष शुध्द //१४// चतुर्दशी :
नेहमी प्रमाणे चरणतिर्थ, अभिषेक पुजा, अलंकार पुजा, आरती या दिवशी महिषासुर मर्दिनी आवतार पुजा मांडण्या्त येते. पुजा आरती होवून घटास माळ घालुन या दिवशी पृथ्वी वर अग्नी पाहुन त्रयोदशी किंवा चतुर्दशी होमासाठी अग्नी स्थापन करण्याहत येतो. अग्नी स्थापना मुख्य यजमानाच्या हस्ते करण्यात येतो. या होमास मुख्य यजमान पत्नी परिवारासह हजर रहावे. शाकंभरी नवरात्र निमित्त वर्णी घेतलेले ब्राम्हण या वेळेस उपस्थित राहुन अग्नी स्थापना होम- हवनास आरंभ करण्याणचा कार्यक्रम विधीवत करण्यात येतो.


पौष शुध्द//१५// पौर्णिमा (भंडारी) :
सकाळी चरणतिर्थ लवकर करण्या्त येते. या दिवशी सकाळच्या अभिषेक पुजेचे वेळी मंदिर संस्था्नचा प्रतिनिधी अर्भिषेक पुजेच हजर रहावे लागते. अभिषेक पुजेस सुरुवात करनास गेल्या्नंतर पुजारी पंचआरती ओवाळतात तत्पुरवी या आरतीस मंदिर संस्थानच्या अभिषेक सुरुवात करण्याास गेलेल्याी प्रतिनिधी ने पंचारतीस स्पदर्श करुन नमस्का‍र करावा.त्यारनंतर पुजारी श्रीस आरती करतील. प्रतिनिधी ने सिहांसनावर डोके ठेवून नमस्कार करावा. यांना महंत, पुजारी श्री चरणावरील कुकु लावतील. येथून पुजारी महंताच्या आदेशाप्रमाणे पुजारी निर्माल्या विसर्जन करतील व अलंकार काढण्यास सुरुवात होईल.


पौष वद्य //१// प्रतिपदा :
नेहमी प्रमाणे नित्य पुजा होऊन सायंकाळी छबीना काढण्यात येईल.


माघ शुध्दि //७// सप्तमी (रथ पंचमी) :
या दिवशी रथ सप्तमी निमित्त दुपारच्या पुजेच्या वेळी श्रीस महाअलंकार रथ पुजा करण्यात येईल. या दिवसापासून उन्हा्ळा सुरुवात होत असल्याने व या दिवसापासून दिवस मोठा होत असल्याने व सुर्य भगवान रथामध्ये अरुढ होत असल्याने सदर पुजा करण्यात येते.